कोकणी माणसासाठी, समाजासाठी आणि विकासासाठी कार्यरत राहण्याची बांधिलकी.
“लाल मातीपासून दूर आलो… पण मातीशी नातं कधीच तुटलं नाही!” कोकणच्या मातीत जन्मलेला माणूस शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि चांगल्या भविष्यासाठी शहरात येतो. आयुष्याची धावपळ सुरू होते… पण मन मात्र गावच्या मातीमध्ये, आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या संस्कृती मध्येच राहते.
शहरात राहताना एखादा कोकणकर अडचणीत सापडतो मग तो शिक्षणाचा प्रश्न असो, नोकरी-व्यवसायाची अडचण असो, वैद्यकीय संकट असो किंवा कुटुंबाची गरज असो अशावेळी त्याला एकटं वाटू नये, “माझ्यासाठी कुणीतरी आहे” हा विश्वास त्याच्या मनात असावा, हीच आमची भावना आहे.
याच भावनेतून “आम्ही कोकणकर फाउंडेशन” ची स्थापना झाली आहे. कोकणकरांच्या सुखात सहभागी होणे, दुःखात खंबीरपणे सोबत उभे राहणे, अडचणीच्या वेळी मदतीचा हात देणे आणि प्रत्येक कोकणकराला प्रगतीची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हा आमचा संकल्प आहे.
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करताना आपली माणसं जोडायची, आपली संस्कृती जपायची आणि पुढच्या पिढीसाठी अभिमानाने सांगता येईल असा कोकण घडवायचा, हेच आमचे स्वप्न आहे.
आपण कोकणापासून कितीही दूर आलो, तरी कोकण आपल्या मनापासून कधीच दूर जात नाही, आणि कोकणकर कधीच एकटा नसतो !
“आपलं कोकण, आपली माणसं, आपली जबाबदारी”
आम्ही कोकणकर फाउंडेशन
एकत्र येऊ • प्रगती करू • कोकण घडवू !
गरजूंना प्रत्यक्ष सहकार्य.
व्यक्ती, संस्था आणि युवकांना जोडणे.
शिक्षण, कौशल्य आणि संधी.
जबाबदार कार्यपद्धती.